फलोत्पादन क्षेत्रात मूल्यसाखळी उभारून किफायतशीर शाश्वत शेती उद्योग उभारण्याची संधी

H Square

‘एफपीसी’ इनक्युबेशन सेंटर फॉर हॉर्टिकल्चर

भारतीय शेतीला जागतिक बाजारपेठेत अग्रस्थानी नेण्याची ताकद हॉर्टिकल्चर अर्थात फलोत्पादन क्षेत्रात आहे. जागतिक पातळीवर फलोत्पादनात आपला देश दुसऱ्या स्थानावर आहे. आंबा, केळी, नारळ, काजू, पपई आणि डाळिंबाचे आपण सर्वांत मोठे उत्पादक; तर द्राक्षे, केळीच्या उत्पादकतेत प्रथम स्थानावर आहोत. देशाच्या एकूण कृषी उत्पन्नात (जीडीपी) फलोत्पादन क्षेत्राचा ३०.४ टक्के वाटा theme आहे. एकूण कृषिक्षेत्राच्या एक दशांश क्षेत्र असूनही फलोत्पादन पिकांपासून मिळणारे उत्पन्न एकत्रित कृषी उत्पन्नाच्या एक चतुर्थांश आहे. परंपरागत पिकांशी तुलना करता फलोत्पादन पिकांचे एकरी उत्पन्न ४ ते १० पट अधिक असते. या पिकांची वैविधता यामागचा महत्त्वाचा घटक आहे.
डेअरी-पशुसंवर्धन क्षेत्रात देशात एकात्मिक मूल्यवर्धन व मार्केटिंगच्या साखळीतून अभूतपूर्व धवलक्रांती झाली. फलोत्पादन क्षेत्रापुढे डेअरी क्षेत्राचा आदर्श ठेवता येईल. या दोन्ही क्षेत्रांमध्ये अनेक साम्यस्थळे आहेत. नाशवंत परंतु ‘हाय व्हॅल्यू’ असलेली उत्पादने, रोजगार निर्माण करु शकणारी व उत्पन्न वाढविण्याच्या सर्वाधिक संधी असलेली ही दोन्ही क्षेत्रे आहेत. ‘सह्याद्री फार्म्स’ने गेल्या दशकभरात द्राक्षाची परीपूर्ण मूल्यसाखळी उभारून देशातील सर्वांधिक द्राक्षे निर्यात करणारी कंपनी असे स्थान निर्माण केले. द्राक्षानंतर इतर सर्व पिकांसाठी सह्याद्री शेतकऱ्यांच्या मालकीच्या मूल्यसाखळ्या विकसित करीत आहे.

महाराष्ट्राच्या कृषिक्षेत्राची उलाढाल सध्या २ लाख ४० हजार कोटींची theme आहे. २०३० पर्यंत म्हणजे येत्या दहा वर्षांतच ही उलाढाल १० लाख कोटींवर जाऊ शकते. शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या (एफपीसी) माध्यमातून हे शक्य आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या बहुसंख्य कंपन्या अडखळत आहेत व प्रत्येक टप्प्यावर संघर्ष करीत आहेत. त्यामागे अनेक कारणे आहेत. समस्या व प्रश्नही आहेत. या सगळ्यांवर व्यावहारिक उपाय आणि बिनचूक उत्तरे एका ठिकाणी देणारा ‘प्लॅटफॉर्म’ अत्यावश्यक होता. सध्याच्या काळाची ही गरजच होती. उत्पादन, प्रक्रिया, मूल्यवर्धन, ब्रँडींग, मार्केटिंग आदी घटक एकत्र जोडल्यावर शेतकऱ्यांच्या मालकीच्या पीकनिहाय कंपन्यांची भक्कम साखळी तयार होऊ शकते. हे मध्यवर्ती सूत्र डोळ्यांपुढे ठेवून सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या पुढाकारातून, कलेक्टीव्हज् फॉर इंटीग्रेटेड लाईव्हलीहूड इनिशिएटीव्हज् (टाटा ट्रस्टचा उपक्रम), डिजीटल इम्पॅक्ट स्क्वेअर( DISQ) टी.सी.एस फाउंडेशन इनिशिएटीव्ह, सोशल-अल्फा (Social-Alpha) व टाटा स्ट्राईव्ह यांच्या सहकार्याने आणि महाराष्ट्र शासनाच्या सक्रीय सहभागातून 'H Square: एफपीसी इनक्युबेशन सेंटर फॉर हॉर्टिकल्चर' ची स्थापना करण्यात आली आहे.
सध्या अस्तित्वात असलेल्या चांगल्या शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून फलोत्पादन क्षेत्रात जागतिक पातळीवर स्पर्धेत भक्कमपणे टिकू शकतील, अशा शेतकऱ्यांच्या मालकीच्या मूल्यसाखळ्या उभ्या करणे, शेतकरी उत्पादक कंपन्यांना प्रगतीच्या पुढच्या टप्प्यावर नेणे, या कंपन्यांना जागतिक कृषी मूल्यसाखळीचा हिस्सा बनवणे आणि या माध्यमातून ‘एफपीसी’ मॉडेल शाश्वत बनविणे, ही या इनक्युबेशन सेंटर सुरू करण्यामागची उद्दिष्टे आहेत. आमची भूमिका प्रामाणिक व नव्या जागतिक व्यवसाय मूल्यांशी सुसंगत आहे. येत्या १० वर्षांत फलोत्पादन क्षेत्राच्या माध्यामातून महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचा पर्यायाने शेतीचा कायापालट होईल हा विश्वास आहे.
- विलास शिंदे,
व्यवस्थापकीय संचालक, सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कं. लि.

कोणतीही शेतकरी उत्पादक कंपनी एखाद्या ‘स्टार्ट-अप’ सारखी असते.अशा ‘स्टार्ट-अप’ला सुरवातीलाच व्यवसाय वाढीसाठी आवश्यक असलेली योग्य इकोसिस्टीम्स(पूरक व्यवस्था)मिळताच शेतकरी उत्पादक कंपनी वेगाने वाढून स्वतःच्या शेतकरी समूहासाठी संपत्ती निर्माण करू शकते. आगामी चार वर्षांत सरकारने १० हजार शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्याचे ठरविले आहे.अशा उदयोन्मुख शेतकरी कंपन्यांचे व्यावसायिक पद्धतीने संवर्धन करण्याची तातडीची गरज आहे.‘H Square: एफपीसी इनक्युबेशन सेंटर फॉर हॉर्टीकल्चर’, ही या क्षेत्रात देशातील पहिलीच संकल्पना आहे. शेतकरी उत्पादक कंपन्यांची वेगाने वाढ करणे व किफायतशीर, शाश्वत शेती उद्योग उभारण्याच्या संधीतून ग्रामीण भागातील समृद्धी वाढविणे, हेच इनक्युबेशन सेंटरचे लक्ष्य आहे.
-मनोज कुमार
को-फाउंडर,सी.ई.ओ.,सोशल अल्फा

शेतीतील प्रश्नांची सोडवणूक करून त्यातून संपत्ती निमार्णाची वाट धरण्यासाठी शेतकऱ्यांनी एकत्र येणे हाच पर्याय आहे. तंत्रज्ञान, उद्योजकता, नवसंशोधन हे कृषिक्षेत्राला पुढे घेऊन जाणारे महत्त्वाचे माध्यम असणार आहे. देशातील तरूण उद्योजक व स्टार्ट-अप यांच्या वाढीसाठी पूरक ठरलेला ‘स्टार्ट-अप इनक्युबेशन’ सेंटर हा प्रोग्राम आम्ही फलोत्पादन क्षेत्रातील शेतकरी उत्पादक कंपन्यासाठी घेऊन आलो आहोत. ‘एफपीसी इनक्युबेशन सेंटर फॉर हॉर्टीकल्चर’च्या माध्यमातून उद्योजक शेतकरी आणि सक्षम शेतकरी उत्पादक कंपन्या उभ्या राहतील, ही खात्री आहे.
- संदीप शिंदे,
हेड ऑफ अलायन्सेस, ऑपरेशन्स अँड इनोव्हेशन कोच,
डिजीटल इम्पॅक्ट स्क्वेअर, टी.सी.एस. फाउंडेंशन इनिशिएटीव्ह

एफपीसी इनक्युबेशन सेंटरचे फायदे

कौशल्य आणिप्रशिक्षण

किफायतशीर कृषी निविष्ठा,नाविन्यपूर्ण संशोधन व स्टार्ट-अप यांना जोडून देणे

काढणी पश्चात तंत्रज्ञान व बाजारपेठेशी जोडण्याची संधी

वित्त व्यवस्थापन

इनक्युबेशन प्रोगॅम म्हणजे काय?
आज जगभरात स्टार्ट-अप व इनक्युबेशन सेंटर हे शब्द सर्रास कानावर पडतात. विशेषत: माहीती व तंत्रज्ञान क्षेत्र तसेच नवीन उद्योगांमध्ये स्टार्ट-अप व इनक्युबेशन सेंटर हे आजच्या युवा पिढीला व नव-उद्योजकांना नवीन नाही. स्टार्ट-अप म्हणजे नवीन उद्योग हे आपण एकून आहोत. मात्र इनक्युबेशन सेंटर कृषी क्षेत्रात व विशेषत: शेतकरी वर्गासाठी एकदमच नवीन संकल्पना आहे. आपण ही संकल्पना समजून घेण्याचा प्रयत्न करू या.

इनक्युबेशन म्हणजे नेमके काय?
आपल्या कुटूंब रचनेच्या दृष्टीकोनातून इनक्युबेशन कार्यक्रम ही संज्ञा समजून घेण्याचा प्रयत्न करू. जसे कुटूंबातील छोट्या मुलाला बाहेरच्या जगात स्वयंपुर्ण करण्यासाठी घरातील मंडळी त्याला शिक्षण देणे, त्याच्या आरोग्याची काळजी घेणे, त्याच्यावर संस्कार करणे अशा रितीने त्याला वाढवत असतात. घरातील मोठी मंडळी आपल्या आयुष्यातील अनुभवांच्या आधारे त्या मुलाला अधिक सक्षम बनविण्याचा प्रयत्न करतात. बाहेरच्या स्पर्धेला तोंड देणे त्याला सहजसोपे जावे म्हणून भरभक्कम पाया तयार करून जे पुरक वातावरण त्याच्या भोवती तयार केले जाते, हा इनक्युबेशनचाच प्रकार आहे.

याच धर्तीवर नवीन उद्योगांना किंवा प्राथमिक अवस्थेत असलेल्या उद्योगांना स्वयंपूर्ण करणे व वाढीसाठी आवश्यक ते सहाय्य करणे, संसाधने उपलब्ध करून देणे या प्रक्रियेला start up incubation असे म्हणतात. यामध्ये उत्पादन विकसित करणे, बाजारपेठ मिळवून देण्यासाठी सहकार्य करणे,तंत्रज्ञानाची जोड देणे, निधी उभा करण्यासाठी मार्गदर्शन करणे, गुंतवणूकदार जोडून देणे, उद्योग चालविण्यासाठी चांगले मनुष्यबळ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे इ गोष्टींचा समावेश असतो. चांगल्या नव-उद्योगांना (स्टार्ट-अप) विविध निवड प्रक्रियेव्दारे निवडून त्यांच्यासाठी कालबध्द कार्यक्रमाची रचना करणे व तज्ञ मार्गदर्शकांच्या मदतीने या उद्योगांना अधिक बळकटी देणे हे इनक्युबेशन सेंटरचे प्रमुख कार्य असते.
फलोत्पादन क्षेत्रासाठीच्या पहिल्या इनक्युबेशन सेंटरची स्थापना
फलोत्पादन क्षेत्रात काम करणाऱ्या शेतकरी उत्पादक कंपन्यांना वाढीसाठी सह्याद्री फार्म्स् व कलेक्टीव्हीज फॅर इंटीग्रेटेड लाईव्हलिहूड इनिशिएटीव्हज् (टाटा ट्रस्टचा उपक्रम), डिजीटल इम्पॅक्ट स्केअर( DISQ) टी.सी.एस फौडेशन इनिशिएटीव्ह, सोशल-अल्फा (Social-Alpha) व टाटा स्ट्राईव्ह यांच्या संयुक्त विद्यमाने इनक्युबेशन सेंटरची निमिर्ती करण्यात आली आहे.

इनक्युबेशन प्रोग्रॅम कोणासाठी असेल
इनक्युबेशन कार्यक्रम हा फलोत्पादन (Horticulture) क्षेत्रात काम करणाऱ्या शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी आहे. ज्या कंपन्याना कंपनी स्थापन करून ६ महीने ते जास्तीत जास्त ७ वर्षे झालेली आहेत अशाच कंपन्या यामध्ये सहभागी होऊ शकतील. निवड झालेल्या शेतकरी उत्पादक कंपनीच्या सीईओ, चेअरमन व एका संचालकाना सहभागी होता येईल. सीईओ व चेअरमन एकच असेल तर त्यांच्या बरोबर दोन संचालकांना या प्रकल्पात सहभागी होता येईल.

फाउंडींग पार्टनर